भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमच्या कपाळें तुज ऐसी बुद्धी । धरावी ते शुद्धी योगा नये

amachya kapalen tuj aisi buddhi | dharavi te shuddhi yoga naye

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
आमच्या कपाळें तुज ऐसी बुद्धी । धरावी ते शुद्धी योगा नये ॥१॥ काय या राहिलें विनोदावांचून । आपुलिया भिन्न केलें आम्हां ॥ध्रु.॥ कोठें मूर्त्तिमंत दावीं पुण्यपाप । काशासी संकल्प वाहाविसी ॥२॥ तुका म्हणे आतां आवरावा चेडा । लटिकी च पीडा पांडुरंगा ॥३॥