भजनी मालिका
← भजनांकडे परत

आमचा साचार आमचा विचार

amacha sachar amacha vichar

आमचा साचार आमचा विचार । सर्व हरिहर एकरूप ॥ १ ॥ धन्य माझा भाव गुरूचा उपदेश । सर्व ह्रषीकेश दावियेला ॥ २ ॥ हरिवीण दुजे नेणें तो सहजे । तया गुरुराजें अर्पियेलें ॥ ३ ॥ हरि हेंचि व्रत हरि हेंचि कथा । हरिचिया पंथा मनोभाव ॥ ४ ॥ देहभाव हरि सर्वत्र स्वरूप । एक्या जन्में खेप हरिली माझी ॥ ५ ॥ निवृत्ति हरी प्रपंच बोहरी । आपुला शरीरीं हरि केला ॥ ६ ॥