भजनी मालिका

भजने

मातापिता घरीं आहेती समस्तें । वर्तमान तयातें श्रुत करुं ॥१॥ कृपा करुनी यावें तुम्ही आश्रमासी । सनाथ करावयासी कृपादृष्टि ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

माती तुडवितां नाहीं देहस्थिती । आठवीत चित्तीं पांडूरंग ॥१॥ गोरोबाची कांता पाणियासी जातां । पुत्राला पाहतां खेळतसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मातीचा हो हत्ती पूजोनी स्वामीनी सजीव करोनी घरी आले ।।१।। होसुरीचे लोक घाबरे होवोनी। आले परतोनी पिताजवळी ॥२॥

रचनाकार: संत विठाबाई

माते बळिया शिरोमणी । कृष्ण नाटक हा विंदानी । आम्हां जळतजळतां वनीं । येणें रक्षिले निमिषाधें ॥१॥ आम्हां जाळित आला ओणवा । विराटरुपी हा झाला तेव्हां । मुखचि पसरुनीयां अघवा । प्राशन केला दावानळ ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

मातेचा आठव बाळावरी स्नेहो । तैसा धरा देवो मनीं सदा ॥१॥ बाळा पाहूनियां माता संतोषत । तैसा धरा हेत देवावरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मातेचिया गळां न मिले गळसरी । बाइलेसी सरी सोनियाची ॥१॥ मातेचिये हातां न मिळे कांकण । बाइले करीं तोडे घडी जाण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मातेची अवस्था काय जाणे बाळ । तिसी तों सकळ चिंता त्याची ॥१॥ ऐसें परस्परें आहे चि विचारा । भोपळ्याचा तारा दगडासी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

मातेच्या कैवारा सहस्त्रार्जुन वधी । एकवीस वेळां पृथ्वी नि:क्षत्रिय शोधी ॥१॥ तोचि मायबाप चंद्रभागेतीरीं । कर कटावरी ठेउनी उभा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मातेलागीं पुसे पिता माझा कोण । ते म्हणे वचन ऐक बाळा ॥१॥ क्षिराब्धीपासोनी चंद्रमा कां जैसा । होसी तूंहि तैसा राजपुत्र ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

मातेसी न मिळे खावयासी अन्न । बाईलेसी घाली नित्य मिष्टान्न ॥१॥ म्हणे बाईल माझी संसारी बहु । मातेनें मज बुडवलें बहु ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

मातेसी म्हणे बाळ । दूध पितीं मुलें सकळ । मजही दूध तात्काळ । मातें देईं भोजना ॥१॥ मग ते करड्या वांटूनी । जननी काढी शुभ्र पाणी । बारे दूध म्हणोनी । वाटीयें भात कालविला ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ