भजनी मालिका
← भजनांकडे परत

मातेचिया गळां न मिले गळसरी । बाइलेसी सरी सोनियाची

matechiya galan na mile galasari | bailesi sari soniyachi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मातेचिया गळां न मिले गळसरी । बाइलेसी सरी सोनियाची ॥१॥ मातेचिये हातां न मिळे कांकण । बाइले करीं तोडे घडी जाण ॥२॥ मातेसी न मिळे अंगीं चोळी । बाइलेसी नेसवी चंद्रकळा काळी ॥३॥ बाइले आधीन ठेविले जिणें । एका जनार्दनीं नरकी पेणें ॥४॥