भजनी मालिका
← भजनांकडे परत

मातेसी न मिळे खावयासी अन्न । बाईलेसी घाली नित्य मिष्टान्न

matesi na mile khavayasi anna | bailesi ghali nitya mishtanna

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
मातेसी न मिळे खावयासी अन्न । बाईलेसी घाली नित्य मिष्टान्न ॥१॥ म्हणे बाईल माझी संसारी बहु । मातेनें मज बुडवलें बहु ॥२॥ मातेनें माझा संसार बुडविला । माझ्या बाइलेनें वाढविला ॥३॥ माता माझी अभागी करंटी । बाईल प्रत्यक्ष सभागी मोठी ॥४॥ एका जनार्दनीं बाइलेआधीन जाहला । मातेसी अबोला धरिला तेणें ॥५॥