भजनी मालिका

भजने

भूतीं भगवद्भाव । मात्रासहित जीव । अद्वैत ठाव । निरंजन एकला ॥१॥ ऐसीं गर्जती पुराणें । वेदवाणी सकळ जन । संत गर्जतील तेणें । अनुभवें निर्भर ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भूतीं भूतात्मा देखतां । ठेली जडोनि एकात्मता । नाढळे गुणदोष वार्ता । नमन नम्रता त्यां अंगी ॥१॥ धन्य त्यांचे जन्मकर्म । सम नाढळे ज्या विषम । गळोनियां क्रोध काम । झाले निष्काम निर्लोभ ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भूमि भार झाला चालली अदकांत । धरूमियां रूप गाईचें हो ॥१॥ विधीपासीं गेली रडूं ते लागली । समद्र वहिली कथा सांगे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भूमिदानें होसी भूमिपाळु । कनकदानें कांति निर्मळु । चंदनदानेम सदा शीतळु । जन्मोजन्मीं प्राणिया ॥१॥ अन्नदाने दृढा-युषी । उदकदानें सदासुखीं । मंदिरदानें भुवनपालखी । सुपरिमळू उपचारां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भूमी शोधोनी साधिलें काज । गुरुवचन बीज पेरियलें ॥१॥ कैसें पिक पिकलें प्रेमाचें । सांठवितां गगन टाचें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भूमीचें मार्दव । सांगे कोंभाची लवलव । तैसे आचार गौरब । सुकुलिन जनाचे ॥१॥ झाड जाणावें फूलें । मानस जाणावें बोलें । भोगें जाण्याबेम केलें । जन्मांतरींचें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भूली भटकी आई कान्हा तोरे गांवछे । मारो नंदनंदन चित्त जडे तोरे पावछे लालना ॥१।। चली आई परपंच हाटसे । तुं केव धरियों मेरे वाटछे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भूषक हव्यासें चालूनि भूमीतेम । मांजर तयातें टप-तसे ॥१॥ तसा तुज काळ टपे वेळोवेळां । वेगीं त्या गोपाळा भजावें बापा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भृंगीचिया अंगीं कोणतें हो बळ । शरिरें अनाढळ केली आळी ॥१॥ काय तिनें तपमुद्रा धरियेली । म्हणोनियां झाली भृंगीं अंगें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भेट देईं मज ह्मणे बळीराम । न वर्णवे प्रेम अक्रूराचें ॥१॥ पेंद्यासी पुसती अवघे गडी तेव्हां । कोणरे हा बावा आला येथें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भेटसी केधवां माझिया जिवलगा । ये गा पांडुरंगा मायबापा ॥१॥ चित्त निरंतरीं तुझे महाद्वारीं । अखंड पंढरी ह्रदयीं वसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भेटिलागीं माझा फुटतसे प्राण । काया वाचा मनें जीवेंभावें ॥१॥ जया देखे तया पुसें हेंचि मात । कैं मज अनंत बोलावील ॥२॥

रचनाकार: संत नामदेव