भजनी मालिका
← भजनांकडे परत

भूमीभर वायां । कां रें जन्मली ही काया

bhumibhar vayan | kan ren janmali hi kaya

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भूमीभर वायां । कां रें जन्मली ही काया ॥१॥ न घडे वाचे नामस्मरण । जिव्हा नव्हे चर्म जाण ॥२॥ न घडे करें दानधर्म । कर नोहेती सर्प जाण ॥३॥ पायीं तीर्थयात्रा न घडे । पाय नोहेते ते केवळ लाकडें ॥४॥ एका जनार्दनीं ते वेडे । नरदेहीं प्रत्यक्ष रेडे ॥५॥