भजनी मालिका
← भजनांकडे परत

भूमी शोधोनी साधिलें काज । गुरुवचन बीज पेरियलें

bhumi shodhoni sadhilen kaj | guruvachan bij periyalen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भूमी शोधोनी साधिलें काज । गुरुवचन बीज पेरियलें ॥१॥ कैसें पिक पिकलें प्रेमाचें । सांठवितां गगन टाचें ॥२॥ सहाचारी शिणले मापारी । कळला नव्हे अद्याप वरी ॥३॥ एकजनार्दनीं निजभाव । देहीं पिकला अवघा देव ॥४॥