भजनी मालिका

भजने

भाविकांचें काज अंगें देव करी । काढी धर्माघरीं उच्छीष्ट तें ॥१॥ उिच्छष्ट तीं फळें खाय भिल्लटीचीं । आवडी तयांची मोठी देवा ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

भाविकांचें स्थान पंढरी पावन । अभाविकां जाण नावडे तें ॥१॥ म्हणोनि चिंतन विठ्ठलाचें वाचें । अभाविकां साचें नावडे नाम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भाविकांच्या लोभा होऊनी आर्तभूत । उभाचि तिष्ठत पंढरीये ॥१॥ काय करों प्रेम न कळे या देवा । गुंतोनिया भावा राहे सुखें ॥२॥

रचनाकार: संत चोखोबा

भाविकांसी नित्य नवें हें सोपारें । पंढरी उच्चार करितां वाचें ॥१॥ हो कं अनामिक अथवा शुद्ध वर्ण । ज्ञातीसी कारण नाहीं देवा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भावें आळवितां देवा । लागला हातीं जुनाट ठेवा । दैव मोडीनी आले दैवा । सुख विश्रांती पावलों ॥१॥ आतां वेचूं खाऊं जेऊं । शोभती अळंकार ते लेऊं । आपुलें सुहद गौरवूं । हरिभक्त वैष्णव साबडे ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भावें करितां माझी भक्ति । विषयवासना जळोनि जाती ॥१॥ चालतां माझे भक्तिपंथीं । सकळ साधनें जळोनि जातीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भावें घातली कास देव झाला दास । सोशी गर्भवास भाविकांचे ॥१॥ भावचि कारण भावचि कारण । यापरतें साधन आणिक नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भावें जनार्दन बोले उद्धवासी । बारे तूं परीयेसी गुह्मा गोष्टी ॥१॥ गुह्मा गोष्ट तुज सांगतों निभ्रांत । हृदयें फुटत आनंदेंसी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भावें वोजावली भूमिका । वरी कृपाघन वोळला निका । संतीं बीज दीधला फुका । तेचि पेरिलें तोचि क्षणीं ॥१॥ वाफलें तें वरावरी । कणिसें दाट आल्या घुमरी । पिकलें न समाये अंबरीं । चहुकोनि सारिखेचि ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

भावेंचि भजन जनी जनार्दन । नित्य हें वचन रामनाम ॥१॥ खुंटतील योनी तुटेल यातना । भक्ति नारायणा पावेल तुझी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

भावेंविण देव नयेचि पै हातां । वाउगें फीरतां रानोरान ॥१॥ मुख्य तें स्वरुप पाहिजे तो भाव । तेणें आकळे देह निःसंदेह ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ