भजनी मालिका
← भजनांकडे परत

भावें वोजावली भूमिका । वरी कृपाघन वोळला निका । संतीं बीज दीधला फुका । तेचि पेरिलें तोचि क्षणीं

bhaven vojavali bhumika | vari krupaghan volala nika | santin bij didhala phuka | techi perilen tochi kshanin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
भावें वोजावली भूमिका । वरी कृपाघन वोळला निका । संतीं बीज दीधला फुका । तेचि पेरिलें तोचि क्षणीं ॥१॥ वाफलें तें वरावरी । कणिसें दाट आल्या घुमरी । पिकलें न समाये अंबरीं । चहुकोनि सारिखेचि ॥२॥ निळा केला भाग्यवंत । सवंगीता नावरे पीक अदभुत । रसीवा केला नलगे अंत । माप करितां नावरेसा ॥३॥ उमाणु जातां अधीकची वाढे । दिसोंचि लागे पुढें पुढें । सांजे भरले सीग नमोडे । मोडति गोड ओढितां ॥४॥ नवल पिकाची हे धणी । होती संतकृपेची पेरणी । पुरे पुरे नव्हेचि उणी । पदरीं भरुनि बैसलों ॥५॥ निळा झाला सदैव आतां । अपार लेखाचि नव्हे चित्ता । साठऊं जाणतां नेणता । राहो भरिता उरलें तें ॥६॥