भजनी मालिका
← भजनांकडे परत

भावेंविण देव नयेचि पै हातां । वाउगें फीरतां रानोरान

bhavenvin dev nayechi pai hatan | vaugen phiratan ranoran

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भावेंविण देव नयेचि पै हातां । वाउगें फीरतां रानोरान ॥१॥ मुख्य तें स्वरुप पाहिजे तो भाव । तेणें आकळे देह निःसंदेह ॥२॥ संतसमागम नाम तें पावन । वाचे नारायण हाचि भाव ॥३॥ एका जनार्दनीं सोपा मंत्र राम । गातां जोडे धाम वैकुंठींचें ॥४॥