भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाविकांचें काज अंगें देव करी । काढी धर्माघरीं उच्छीष्ट तें

bhavikanchen kaj angen dev kari | kadhi dharmagharin uchchhishta ten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
भाविकांचें काज अंगें देव करी । काढी धर्माघरीं उच्छीष्ट तें ॥१॥ उिच्छष्ट तीं फळें खाय भिल्लटीचीं । आवडी तयांची मोठी देवा ॥ध्रु.॥ काय देवा घरीं न मिळेची अन्न । मागे भाजीपान द्रौपदीसी ॥२॥ अर्जुनाचीं घोडीं धुतलीं अनंतें । संकटें बहुतें निवारिलीं ॥३॥ तुका म्हणे ऐसीं आवडती लडिवाळें । जाणीवेचें काळें तोंड देवा ॥४॥