भजनी मालिका

भजने

ब्रह्माज्ञानी वाचें सांगतां नये । जैं कृपा होये श्रीगुरुची ॥१॥ लाभेल लाभेल ब्रह्माज्ञान क्षणीं । वाउगी कहाणी बोलुनी काय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ब्रह्मांडनायक विश्वाचा गोसावी । तो केला पांडवी म्हणियारा ॥१॥ भावाचा लंपट भक्ताम पराधीन । सोडोनी अभिमान दास्य करी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ब्रह्माडभरीं कीर्ति संतांचा महिमा । वर्णावया आम्हां मति थोडी ॥१॥ एक मुखें वानुं चतुरानन शीणु । सहस्त्र मुखेंगुणु वानितां नयें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ब्रह्मादिक देव त्यांचें रंगीं नाचती । सनकादिक त्याचें ध्रुपद धरिती ॥१॥ त्यापुढें गीत नृत्य करिती । त्यापुढें मानव केवीं ताल धरिती ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ब्रह्मादिक वेडे जयासाठीं होती । तो गोकुळी श्रीपती लोणी चोरी ॥१॥ कवाड ते जैसें आहे तैशापरी । येतो जातो हरी न कळेचे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ब्रह्मादिका आठकु तो । शिवध्यान ध्यानकु तो गे बाई ॥१॥ गौरीजाप्यसहस्त्रनामीं तो । पुण्यपावन त्रैलोक्य तो गे बाई ॥२॥

ब्रह्मादिकां न कळे तें रुप सुंदर । गोकुळीं परिकर नंदाघरीं ॥१॥ रांगणां रांगतु बाळलीले खेळतु । दुडदुडां धांवतु गायीपाठीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ब्रह्मादिकां पाहतां ठक पडियंलें । पहाहो कैवल्य गौ-ळिया जोडलें ॥१॥ कोण्या ऋणें या केला नकळे । परब्रह्म आमुचें आहे सोंवळें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

ब्रह्मीं नाहीं कर्म नाहीं उपासना । नाहीं ध्येय ध्याना ठाव जेथें ॥१॥ जाणीव नेणीव भगवंतीं नाहीं । विज्ञान जें तेंहीं लया जाय ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

ब्रह्मीं नाहीं भवभ्रांति । ब्रह्मीं नाहीं दिवसराती ॥१॥ ब्रह्मीं नाहीं रूपवर्ण । ब्रह्मीं नाहीं काळकरण ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ