भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रह्मांड करी हरि ब्रह्म झडकरी

brahmand kari hari brahma jhadakari

ब्रह्मांड करी हरि ब्रह्म झडकरी । तें नंदयशोदेघरीं खेळतसे ॥ १ ॥ त्रैलोक्यदुर्लभ ब्रह्मांदिका सुलभ । रुक्मिणीवल्लभ कृष्ण सांवळा॥ २ ॥ हिरण्याक्ष वधूनि दाढेवरी मेदिनी । तो हा चक्रपाणी यशोदेचा ॥ ३ ॥ रामावतारु गाढा दशशिरा रगडा । रिठासुर दाढा तेणेंपाडें ॥ ४ ॥ चतुर्भुज श्रीपति सुकुमार साजती । शंख चक्रांकिती हरि माझा ॥ ५ ॥ निवृत्ति ध्यानशूर सर्वरूपें श्रीधर । जिंकिला भौमासुर रणयुद्धीं ॥ ६ ॥