भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रह्मांड उतरंडी ज्याचे इच्छे घडी

brahmand utarandi jyache ichchhe ghadi

ब्रह्मांड उतरंडी ज्याचे इच्छे घडी । तो उच्छिष्टें काढी धर्माधरीं ॥१॥ देखिला वो माये चक्रभुज स्वभावी । वारु ते वागवी अर्जुनाचे ॥२॥ याज्ञिक अर्पिती मंत्राच्या आहुती । तो द्रौपदियेप्रति भाजि मागे ॥३॥ निवृत्तिदैवत पूर्ण मनोरथ । पांडव कृतार्थ कृष्णनामें ॥४॥