भजनी मालिका
← भजनांकडे परत

ब्रह्मांडाचे भुवनीं कमळ तें सुंदर

brahmandache bhuvanin kamal ten sundar

ब्रह्मांडाचे भुवनीं कमळ तें सुंदर । पाकोळ्या साचार चार तेथें ॥१॥ औट हात स्थूळ अंगुष्ठ । सूक्ष्म पर्वार्ध कारण जाण रया ॥२॥ महाकारण मसुरामात्र सदोदित । ब्रह्मरंध्र साद्यंत वसतसे ॥३॥ चहूं शून्यवर्ण देह चार पहा । कृष्ण निळ शोभा विकासली ॥४॥ ज्ञानदेव म्हणे आतां फार म्हणो काय । सहस्त्रदळीं निश्चय आत्मा असे ॥५॥