भजनी मालिका

भजने

चालिले घेऊनि देव ऋषीश्वरा । आवघियां पुढारां गरुडदेव ॥१॥ दिवसानुदिवस चालिले सत्वर । पहावें गोदातीर म्हणोनियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चालिलें बाळक रुदन करीत । देखोनी गांवांत हाहा: कार ॥१॥ पाहा हें रायानें मांडिलें अनुचित । कासया तो भ्रांत झाला नेणों ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चालिले ब्राम्हण वार्ता सांगावया । शीघ बैसोनियां ॥१॥ तंव ते तिन्ही देव बाळमूर्ती धारी । मुक्ताई खेचरी आदिमाया ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

चालें दंडवत घालीं नारायणा । आपुल्या कल्याणा लागूनियां ॥१॥ बैसविला पदीं पुत्र राज्य करी । पिता वाहे शिरीं आज्ञा त्याची ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

चाले हें शरीर कोणाचिये सत्ते । कोण बोलवितें हरीविण ॥१॥ देखवी ऐकवी एक नारायण । तयाचें भजन चुकों नको ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

चाळक माझें मन पांगुळ पैं झालें । साक्षात्कारें मन हारपोनी गेलें ॥१॥ मन हारपलें करूं आतां काय । पहावया गेलें तंव परतोनी कांही नये ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चिंतन तें सोपें जगीं । रामकृष्ण म्हणा सत्संगी । उणें पडॊं नेदी व्यंगीं । देव धांवे चिंतनें ॥१॥ चिंतन करितां द्रौपदीं । पावलासें भलते संधीं । ऋषिश्वरांची मांदी । तृप्त केली क्षणमात्रें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चिंतन तें हरिचरण । हेंचि कालीमाजींप्रमाण । सर्व पुण्याचें फल जाण । नामस्मरण विठ्ठल ॥१॥ मागें तरले पुढे तरती । याची पुराणीं प्रचिती । वेद शास्त्र जया गाती । श्रुतीहि आनंदें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चिंतनासी न लगे वेळ । कांही न लगे तया मोल । वाचे वदा सर्वकाळ । राम हरी गोविंद ॥१॥ हाचि पुरे मंत्र सोपा । तेणें चुके जन्म खेपा । आणिक तें पापा । कधी नुरें कल्पातीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चिंतनी केला उद्धार । चिंतनें तरले नारीनर । पशुपक्ष्यादि साचार । चिंतनेची तारिले ॥१॥ एवढी चिंतनाची थोरी । महा पापा होय बोहरी । यातीकुळाची वारी । कोण पुसे थोरीया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ