भजनी मालिका

भजने

चळलें काय न करी बडबड । न म्हणे फिकें गोड भुकेलें तें ॥१॥ उमजल्याविण न धरी सांभाळ । असो खळखळ जनाची हे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

चवदा भुवनें जयाचिये पोटीं । तोचि आम्हीं कंठीं साठविला ॥१॥ काय एक उणें आमुचिये घरीं । वोळंगती द्वारीं रिध्दिसिध्दी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

चवदा भुवनें लोक तिन्हीं दाढे जो कवळी । संपुष्ट तो संबळीमध्यें देखा ॥१॥ उत्पित्तसंहारकरिता जो पाळण । तो नंदा नंदन म्हणवीतसे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

चवदाशें वर्षें शरीर केलें जतन । नाहीं अज्ञानपण गेलें माझें ॥१॥ अहंकारें माझें बुडविलें घर । जालों सेवा थोर स्वामीसंगें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चहुं वाचांपरता चहुं वेदां निरुता । न कळे तत्त्वतां चतुर्वक्त्रा ॥१॥ चौबारा खेळतु सौगंडी सांगातु । लोणी चोरुं जातु घरोघरीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

चहूंकडे स्वर गाताती गायनें । आणिक पुराणें ठाईठाईं ॥१॥ गीतनृत्य नाना करिती तनाना । होतसे झणाणा टाळघोळ ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चांगदेव योगी निष्काम चांगला । स्वरूपीं रंगला केशवाच्याअ ॥१॥ सुगंध अक्षता पुष्पें परिमल । पूजिले सकळ साधुसंत ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चांगला तरी पूर्णकाम । गोड तरी याचें चि नाम । दयाळ तरी अवघा धर्म । भला तरी दासा श्रम होऊं नेदी ॥१॥ उदार तरी लक्ष्मीयेसी । जुंझार तरी कळिकाळासी । चतुर तरी गुणांची च रासी । जाणता तयासी तो एक ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम