भजनी मालिका
← भजनांकडे परत

चवदा भुवनें जयाचिये पोटीं । तोचि आम्हीं कंठीं साठविला

chavada bhuvanen jayachiye potin | tochi amhin kanthin sathavila

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
चवदा भुवनें जयाचिये पोटीं । तोचि आम्हीं कंठीं साठविला ॥१॥ काय एक उणें आमुचिये घरीं । वोळंगती द्वारीं रिध्दिसिध्दी ॥ध्रु.॥ असुर जयाने घातले तोडरीं । आम्हांसी तो जोडी कर दोन्ही ॥२॥ रूप नाहीं रेखा जयासी आकार । आम्हीं तो साकार भक्तीं केला ॥३॥ अनंत ब्रम्हांडे जयाचिये अंगीं । समान तो मुंगी आम्हासाठीं ॥४॥ तुका म्हणे आम्ही देवाहूनि बळी । जालों हे निराळी ठेवुनि आशा ॥५॥