भजनी मालिका
← भजनांकडे परत

चवदाशें वर्षें शरीर केलें जतन । नाहीं अज्ञानपण गेलें माझें

chavadashen varshen sharir kelen jatan | nahin adnyanapan gelen majhen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चवदाशें वर्षें शरीर केलें जतन । नाहीं अज्ञानपण गेलें माझें ॥१॥ अहंकारें माझें बुडविलें घर । जालों सेवा थोर स्वामीसंगें ॥२॥ तापत्रयीं तापलों महाअग्नीं जळालों । अविवेकीं जालों मंदामती ॥३॥ काय माझा देह वायांविण व्यर्थ । आलों शरणागत पांडुरंगा ॥४॥ अभिमानें आलों श्रीआळंकापुरीं । अज्ञान केलें दुरी मुक्ताईनें ॥५॥ नामाअ म्हणे योग दुःखाचें शरीर । काय याचा घोर करूनियां ॥६॥