भजनी मालिका
← भजनांकडे परत

चहूंदारवंटा वोलांडुनि वोजा

chahundaravanta volanduni voja

चहूंदारवंटा वोलांडुनि वोजा । अंतरीं आत्मकाजा बोधिलें वो माय ॥१॥ आनंदाचे चक्षु उघडी पातीं । शब्दा नि:शब्दां अतीति मी जाहालिये वो माये ॥२॥ पांगुळें इंद्रियेग्रामु संवादे आत्मरामु । तो ईश्वरु पूर्णकामु मज भेटवा वो माय ॥३॥ तेथें गोरस जालालें ज्ञाना अंतरी वोजावलें । सदेवपण आलें मज वो माय ॥४॥ पाहतां ठेंगणे डोळे न्याहाळितां आगळें । ते पदप्राप्तीवेगळें सगुणनिर्गुण वो माय ॥५॥ ऐसा हा दिपीं दीपपरनायकू । रखुमादेववरु एकु जोडला वो माय ॥६॥