भजनी मालिका
← भजनांकडे परत

योग्याची संपदा त्याग आणि शांति । उभयलोकीं कीर्ती सोहळा मान

yogyachi sampada tyag ani shanti | ubhayalokin kirti sohala man

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
योग्याची संपदा त्याग आणि शांति । उभयलोकीं कीर्ती सोहळा मान ॥१॥ येरयेरांवरी जायांचें उसणें । भाग्यस्थळीं देणें झाडावेसीं ॥ध्रु.॥ केलिया फावला ठायींचा तो लाहो । तृष्णेचा तो काहो काव्हवितो ॥२॥ तुका म्हणे लाभ अकर्तव्या नांवें । शिवपद जीवें भोगिजेल ॥३॥