भजनी मालिका
← भजनांकडे परत

योगियांचे धन तें ब्रह्म संपन्न

yogiyanche dhan ten brahma sampanna

योगियांचे धन तें ब्रह्म संपन्न । तो हा जनार्दन नंदाघरी ॥१॥ हरिरूप माये सर्वाघटीं आहे । दूध लोणी खाये गौळियांचे ॥२॥ चिंति अजामेळा नाम आलें मुखा । तो वैकुंठीच्या सुखा देत हरी ॥३॥ निवृत्तिचें धन जगाचें जीवन । नाम नारायण तरुणोपाव ॥४॥