भजनी मालिका
← भजनांकडे परत

येती वारकरी । वाट पाहातों तोंवरी

yeti varakari | vat pahaton tonvari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
येती वारकरी । वाट पाहातों तोंवरी ॥१॥ घालूनियां दंडवत । पुसेन निरोपाची मात ॥ध्रु.॥ पत्र हातीं दिलें । जया जेथें पाठविलें ॥२॥ तुका म्हणे येती । जाइन सामोरा पुढती ॥३॥