भजनी मालिका
← भजनांकडे परत

येथूनियां ठाव । अवघे लक्षायाचे भाव

yethuniyan thav | avaghe lakshayache bhav

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
येथूनियां ठाव । अवघे लक्षायाचे भाव ॥१॥ उंची देवाचे चरण । तेथें जालें अधिष्ठान ॥ध्रु.॥ आघातावेगळा । असे ठाव हा निराळा ॥२॥ तुका म्हणे स्थळ । धरूनि राहिलों अचळ ॥३॥