भजनी मालिका
← भजनांकडे परत

येथील जें एक घडी । तये जोडी पार नाहीं

yethil jen ek ghadi | taye jodi par nahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
येथील जें एक घडी । तये जोडी पार नाहीं ॥१॥ किती त्यांचा सासुरवास । कैंचा रस हा तेथें ॥ध्रु.॥ अवघे दिवस गेले कामा । हीं जन्मा खंडण ॥२॥ तुका म्हणे रतल्या जनीं । सोडा झणी कान्होबा ॥३॥