भजनी मालिका
← भजनांकडे परत

येथें नाहीं उरों आले अवतार । येर ते पामर जीव किती

yethen nahin uron ale avatar | yer te pamar jiv kiti

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
येथें नाहीं उरों आले अवतार । येर ते पामर जीव किती ॥१॥ विषयांचे झणी व्हाल लोलिंगत । चेवलिया अंत न लगे भंग ॥ध्रु.॥ वाहोनियां भार कुंथसील ओंझे । नव्हे तें चि माझें थीता त्याग ॥२॥ तुका म्हणे कैसी नाहीं त्याची लाज । संतीं केशीराज साधियेला ॥३॥