भजनी मालिका
← भजनांकडे परत

येणें बोधें आम्ही असों सर्वकाळ । करूनि निर्मळ हरीकथा

yenen bodhen amhi ason sarvakal | karuni nirmal harikatha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
येणें बोधें आम्ही असों सर्वकाळ । करूनि निर्मळ हरीकथा ॥१॥ आम्ही भूमीवरी एक दैवांचे । निधान हें वाचे सांपडलें ॥ध्रु.॥ तरतील कुळें दोन्ही उभयतां । गातां आइकतां सुखरूप ॥२॥ न चळे हा मंत्र न म्हणों यातीकुळ । न लगे काळ वेळ विचारावी ॥३॥ तुका म्हणे माझा विठ्ठल विसांवा । सांठवीला हांवा हृदयांत ॥४॥