भजनी मालिका
← भजनांकडे परत

यमुनेतटीं मांडिला खेळ । म्हणे गोपाळ गडियांसि

yamunetatin mandila khel | mhane gopal gadiyansi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
यमुनेतटीं मांडिला खेळ । म्हणे गोपाळ गडियांसि ॥१॥ हाल मांडा हाल मांडा । वाउगी सांडा मोकळी ॥ध्रु.॥ नांवें ठेवूनि वांटा गडी । न वजे रडी मग कोणी ॥२॥ तुका म्हणे कान्हो तिळतांदळ्या । जिंके तो करी आपुला खेळ्या ॥३॥