भजनी मालिका
← भजनांकडे परत

याचा कोणी करी पक्ष । तो ही त्याशी समतुल्य

yacha koni kari paksha | to hi tyashi samatulya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
याचा कोणी करी पक्ष । तो ही त्याशी समतुल्य ॥१॥ फुकासाठीं पावे दुःखाचा विभाग । पूर्वजांसि लाग निरयदंडीं ॥ध्रु.॥ ऐके राजा न करी दंड । जरि या लंड दुष्टासि ॥२॥ तुका म्हणे त्याचें अन्न । मद्यपानाचे समान ॥३॥