भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्यभिचारिणी गणिका असता कुंटणी । विश्वासतिचे मनीं राघोबाचा

vyabhicharini ganika asata kuntani | vishvasatiche manin raghobacha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
व्यभिचारिणी गणिका असता कुंटणी । विश्वासतिचे मनीं राघोबाचा ॥१॥ ऐसी ही पापिणी वाइली विमानी । अचळ भुवनीं ठेवियेली ॥ध्रु.॥ पतितपावन तिहीं लोकीं ठसा । कृपाळू कोंवसा अनाथांचा ॥२॥ तुका म्हणे धरा विठोबाची सोय । आणिक उपाय नेणों किती ॥३॥