भजनी मालिका
← भजनांकडे परत

वृत्तीवरी आम्हां येणें काशासाठी । एवढी हे आटी सोसावया

vruttivari amhan yenen kashasathi | evadhi he ati sosavaya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वृत्तीवरी आम्हां येणें काशासाठी । एवढी हे आटी सोसावया ॥१॥ जाणतसां परी नेणते जी देवा । भ्रम चि बरवा राखावा तो ॥ध्रु.॥ मोडूनि क्षरलों अभेदाची मूस । तुम्हां कां अळस वोडवला ॥२॥ तुका म्हणे होई लवकरि उदार । लांबणीचें फार काम नाहीं ॥३॥