भजनी मालिका
← भजनांकडे परत

वृत्ति भूमि राज्य द्रव्य उपार्जिती । जाणा त्या निश्चितीं देव नाहीं

vrutti bhumi rajya dravya uparjiti | jana tya nishchitin dev nahin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वृत्ति भूमि राज्य द्रव्य उपार्जिती । जाणा त्या निश्चितीं देव नाहीं ॥१॥ भाडेकरी वाहे पाठीवरी भार । अंतरींचें सार लाभ नाहीं ॥ध्रु.॥ देवपूजेवरी ठेवूनियां मन । पाषाणा पाषाण पूजी लोभें ॥२॥ तुका म्हणे फळ चिंतिती आदरें । लाघव हे चार शिंदळीचे ॥३॥