भजनी मालिका
← भजनांकडे परत

वोळलीचा दोहूं पान्हा । मज कान्हा सांगितला

volalicha dohun panha | maj kanha sangitala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वोळलीचा दोहूं पान्हा । मज कान्हा सांगितला ॥१॥ घ्या जि हेंगे क्षीर हातीं । निगुतीनें वाढावें ॥ध्रु.॥ केलें सांगितलें काम । नव्हे धर्म सत्याचा ॥२॥ तुका म्हणे नवें जुनें । ऐसें कोणें सोसावें ॥३॥