भजनी मालिका
← भजनांकडे परत

वोखटा तरी मी विटलों देहासी । पुरे आतां जैसी जोडी पुन्हां

vokhata tari mi vitalon dehasi | pure atan jaisi jodi punhan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वोखटा तरी मी विटलों देहासी । पुरे आतां जैसी जोडी पुन्हां ॥१॥ किती मरमर सोसावी पुढती । राहिलों संगती विठोबाचे ॥ध्रु.॥ आतां कोण याचा करील आदर । जावो कलेवर विटंबोनि ॥२॥ तुका म्हणे आतां सांडि तें चि सांडि । कोण फिरे लंडी यासी मागें ॥३॥