भजनी मालिका
← भजनांकडे परत

वितीयेवढेंसें पोट । केवढा बोभाट तयाचा

vitiyevadhensen pot | kevadha bobhat tayacha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वितीयेवढेंसें पोट । केवढा बोभाट तयाचा ॥१॥ जळो त्याची विटंबना । भूक जना नाचवी ॥ध्रु.॥ अभिमान सिरीं भार । जाले खर तृष्णेचे ॥२॥ तुका म्हणे नरका जावें । हाचि जीवें व्यापार ॥३॥