भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठल विठ्ठल येणें छंदें । ब्रह्मानंदें गर्जावें

viththal viththal yenen chhanden | brahmananden garjaven

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विठ्ठल विठ्ठल येणें छंदें । ब्रह्मानंदें गर्जावें ॥१॥ वाये टाळ टाळ्याटाळी । होईल होळी विघ्नांची ॥ध्रु.॥ विठ्ठल आदी अवसानीं । विठ्ठल मनीं स्मरावा ॥२॥ तुका म्हणे विठ्ठलवाणी। वदा कानीं आईका ॥३॥