भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठल सोयरा सज्जन विसांवा । जाइन त्याच्या गांवा भेटावया

viththal soyara sajjan visanva | jain tyachya ganva bhetavaya

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विठ्ठल सोयरा सज्जन विसांवा । जाइन त्याच्या गांवा भेटावया ॥१॥ सीण भाग त्यासी सांगेन आपुला । तो माझा बापुला सर्व जाणे ॥ध्रु.॥ माय माउलिया बंधुवर्गा जना । भाकीन करुणा सकिळकांसी ॥२॥ संत महंत सिद्ध महानुभाव मुनि । जीवभाव जाऊनि सांगेन त्या ॥३॥ माझिये माहेरीं सुखा काय उणें। न लगे येणें जाणें तुका म्हणे ॥४॥