भजनी मालिका
← भजनांकडे परत

विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती । विठ्ठल या चित्तीं बैसलासे

viththal soyara sajjan sangati | viththal ya chittin baisalase

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विठ्ठल सोयरा सज्जन सांगाती । विठ्ठल या चित्तीं बैसलासे ॥१॥ विठ्ठलें हें अंग व्यापिली ते काया । विठ्ठल हे छाया माझी मज ॥ध्रु.॥ बैसला विठ्ठल जिव्हेचिया माथां । न वदे अन्यथा आन दुजें ॥२॥ सकळां इंद्रियां मन एक प्रधान । तें ही करी ध्यान विठोबाचें ॥३॥ तुका म्हणे या विठ्ठलासी आतां । नये विसंबतां माझें मज ॥४॥