भजनी मालिका
← भजनांकडे परत

विश्वीं विश्वंभर । बोले वेदांतींचा सार

vishvin vishvambhar | bole vedantincha sar

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विश्वीं विश्वंभर । बोले वेदांतींचा सार ॥१॥ जगीं जगदीश । शास्त्रें वदती सावकाश ॥ध्रु.॥ व्यापिलें हें नारायणें । ऐसीं गर्जती पुराणें ॥२॥ जनीं जनार्दन । संत बोलती वचनें ॥३॥ सूर्याचिया परी । तुका लोकीं क्रीडा करी ॥४॥