भजनी मालिका
← भजनांकडे परत

विश्वातें ठेऊनि आपण निरंजनी

vishvaten theuni apan niranjani

विश्वातें ठेऊनि आपण निरंजनी । नामाची पर्वणी भक्तांलागी ॥ १ ॥ तें रूप संपूर्ण वसुदेवाकुळीं । यादव गोपाळीं वोळलासे ॥ २ ॥ व्यापकपण धीर ब्रह्मांड साकार । तें रूप तदाकार भाग्ययोगें ॥ ३ ॥ निवृत्ति घनवट आपण वैकुंठ । कृष्णनामें पेठ गोकुळीं रया ॥ ४ ॥