भजनी मालिका
← भजनांकडे परत

विश्वाचा चाळक सूत्रधारी एक

vishvacha chalak sutradhari ek

विश्वाचा चाळक सूत्रधारी एक । विज्ञान व्यापक ज्ञानगम्य ॥१॥ तें रूप साजिंरे कृष्ण घनः श्याम । योगियां परम रूप ज्याचे ॥२॥ शिव शिवोत्तम नाम आत्माराम । जनवनसम गोपवेषें ॥३॥ निवृत्ति चाळक सर्वत्र व्यापक । आपरूपें एक सर्वत्र असे ॥४॥