भजनी मालिका
← भजनांकडे परत

विष्णुमय सर्व वैष्णवांसी ठावें । येरांनीं वाहावे भार माथां

vishnumay sarva vaishnavansi thaven | yerannin vahave bhar mathan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विष्णुमय सर्व वैष्णवांसी ठावें । येरांनीं वाहावे भार माथां ॥१॥ साधनें संकट सर्वांलागीं शीण । व्हावा लागे क्षीण अहंभाव ॥ध्रु.॥ भाव हा कठीण वज्र हें भेदवे । परि न छेदवे मायाजाळ ॥२॥ तुका म्हणे वर्म भजनें चि सांपडे । येरांसी तों पडे ओस दिशा ॥३॥