भजनी मालिका
← भजनांकडे परत

विषय तो मरणसंगीं । नेणे सुटिका अभागी

vishay to maranasangin | nene sutika abhagi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विषय तो मरणसंगीं । नेणे सुटिका अभागी ॥१॥ शास्त्राचा केला लुंडा । तोंडीं पाडियेला धोंडा ॥ध्रु.॥ अगदीं मोक्ष नाहीं ठावा । काय सांगावें गाढवा ॥२॥ तुका म्हणे ग्यानगंड । देवा सुख पावो नाड ॥३॥