भजनी मालिका
← भजनांकडे परत

विसरले कुळ आपुला आचार । पती भावे दीर घर सोय

visarale kul apula achar | pati bhave dir ghar soy

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विसरले कुळ आपुला आचार । पती भावे दीर घर सोय ॥१॥ सांडिला लौकिक लाज भय चिंता । रातलें अनंता चित्त झाले ॥२॥ मज आतां कोणी आळवाल झणी । तुका म्हणे कानीं बहिर झालें ॥३॥