भजनी मालिका
← भजनांकडे परत

विकट विकास विनट रूपस

vikat vikas vinat rupas

विकट विकास विनट रूपस । सर्व ह्र्षिकेश दिसे आम्हां ॥ १ ॥ तें रूप साजिरें नंदाचें गोजिरें । उन्मनिनिर्धारे भोगूं आम्हीं ॥ २ ॥ विलास भक्तीचा उन्मेखनामाचा । लेशु त्या पापाचा नाहीं तेथें ॥ ३ ॥ निवृत्ति म्हणे तें सुखरूप कृष्ण । दिननिशीं प्रश्न हरि हरि ॥ ४ ॥