भजनी मालिका
← भजनांकडे परत

विभ्रंशिली बुद्धि देहांती जवळी । काळाची अवकाळीं वायचाळा

vibhranshili buddhi dehanti javali | kalachi avakalin vayachala

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
विभ्रंशिली बुद्धि देहांती जवळी । काळाची अवकाळीं वायचाळा ॥१॥ पालटलें जैसें देंठ सांडी पान । पिकलें आपण यातपरी ॥ध्रु.॥ न मारितां हीन बुद्धि दुःख पावी । माजल्याची गोवी तयापरी ॥२॥ तुका म्हणे गळ लागलिया मत्स्या । तळमळेचा तैसा लवलाहो ॥३॥