भजनी मालिका
← भजनांकडे परत

व्हावया भिकारी हेंचि आम्हां कारण । अंतरोनि जन व्हावें दुरी

vhavaya bhikari henchi amhan karan | antaroni jan vhaven duri

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
व्हावया भिकारी हेंचि आम्हां कारण । अंतरोनि जन व्हावें दुरी ॥१॥ संबंध तुटावा शब्दाचा ही स्पर्श । म्हणऊनि आस मोकलिली ॥२॥ तुका म्हणे दुःखें उबगला जीव । म्हणऊनी कीव भाकीं देवा ॥३॥