भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेसन गेलें निष्काम झालें नर नव्हे नारी । आपल्या तुटी पारख्या भेटी सौरियांचे फेरी

vesan gelen nishkam jhalen nar navhe nari | apalya tuti parakhya bheti sauriyanche pheri

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वेसन गेलें निष्काम झालें नर नव्हे नारी । आपल्या तुटी पारख्या भेटी सौरियांचे फेरी ॥१॥ त्याचा वेध लागला छंद हरी गोविंद वेळोवेळां । आपुलेमागें हासत रागें सावलें घालिती गळां ॥ध्रु.॥ जन वेषा भीतें तोंडा आमुच्या भांडपणा । कर कटीं भीमा तटीं पंढरीचा राणा ॥२॥ वेगळ्या याति पडिलों खंतीं अवघ्या एका भावें । टाकियेली चाड देहभाव जीवें शिवें ॥३॥ सकळांमधीं आगळी बुद्धि तिची करूं सेवा । वाय तुंबामुंडासवें भक्ति नाचों भावा ॥४॥ म्हणे तुका टाक रुका नाचों निर्लज्जा । बहु झालें सुख काम चुकलिया काजा ॥५॥