भजनी मालिका
← भजनांकडे परत

वेडीं तें वेडीं बहुत चि वेडीं । चाखतां गोडी चवी नेणे ॥ध्रु.

vedin ten vedin bahut chi vedin | chakhatan godi chavi nene ||dhru.

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वेडीं तें वेडीं बहुत चि वेडीं । चाखतां गोडी चवी नेणे ॥ध्रु.॥ देहा लावी वात । पालव घाली जाली रात ॥१॥ कडिये मूल भोंवतें भोंये । मोकलुनि रडे धाये ॥२॥ लेंकरें वित पुसे जगा । माझा गोहो कोण तो सांगा ॥३॥ आपुली शुद्धी जया नाहीं । आणिकांची ते जाणे काई ॥४॥ तुका म्हणे ऐसे जन । नरका जातां राखे कोण ॥५॥